नाशकात भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदारांची प्रचारात आघाडी, उमेदवारांना मिळतं बळ
नाशिक, 07 जानेवारी (हिं.स.)। - महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर भाजपाचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी पहिल्याच दिवसापासून घेतलेली आघाडी कायम आहे त्यामुळे भाजप उमेदवारांना मोठे बळ या निमित्ताने मिळाले आहे. महानगरपालिका
भाजपाचे शहराध्यक्ष केदारांची


नाशिक, 07 जानेवारी (हिं.स.)।

- महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर भाजपाचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी पहिल्याच दिवसापासून घेतलेली आघाडी कायम आहे त्यामुळे भाजप उमेदवारांना मोठे बळ या निमित्ताने मिळाले आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी ही सोमवारपासून सुरू झाली आणि प्रचाराला उमेदवार घरोघरी पोहोचू लागले या माध्यमातून मतदारांनाही उमेदवारांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यातून प्रचार जोर पकडून लागला. नासिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुख्य लढत भाजपा विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी गट यांची आहे . राज्यामध्ये शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांचे एकत्रित सरकार असले तरी नाशिक मध्ये मात्र भाजपच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र आलं आहे.

निवडणुकीच्या प्रचाराला सोमवारपासून सुरुवात झाल्यानंतर आता पक्षाचे नेते मंडळी देखील मोठ्या प्रमाणावर प्रचारात उतरली आहे यामध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे विशेष करून भाजपाचे शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे ते स्वतः या प्रचारात उतरले आहे एका दिवसामध्ये शहरातील किमान सात ते आठ वॉर्डनमध्ये स्वतः जाऊन प्रचार करणे काही ठिकाणी चौक सभा घेऊन प्रचार सभा संबोधित करणे, काही प्रभागांमध्ये वेगवेगळ्या बैठका घेणे अशी त्यांची दिवसाची दिनचर्या आहे त्यामुळे सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. एक प्रकारे त्यांनी प्रचारात झोकून दिल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते व उमेदवारांना मोठे बळ मिळाले आहे कारण स्वतःच शहराध्यक्ष प्रचारक म्हणून पुढे येत आहे पक्षाच्या प्रचारक म्हणून कार्यकर्त्यांना सुनील केदार ज्या ठिकाणी सभांना संबोधित करतात त्या ठिकाणी ते कोणावरती टीका करण्यापेक्षा पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार हे महापालिकेमध्ये सत्ता असताना काय विकास काम केली त्या विकास कामांचे आज काय चांगले परिणाम आहेत काय चांगल्या गोष्टी यापुढे करावयाच्या आहेत आणि प्रभागांमध्ये असलेले भाजपचे उमेदवार किती सक्षम आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचे आहेत हे मात्र आठवणीने सांगतात त्यामुळे सुनील केदार यांनी घेतलेल्या प्रचारातील आघाडीने भाजपच्या उमेदवारांना मात्र मोठे बळ मिळाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande