रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्यामुळे नांदेड मध्ये उमेदवारांना संजीवनी
नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)। नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण शहराच्या दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक देखील घेण्यात आली यामुळे भारतीय जनता पक्षाला संजीवनी मिळाली आहे भारतीय जनत
आदरणीय मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींकडून प्रेरणा घेत,


नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)। नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण शहराच्या दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक देखील घेण्यात आली यामुळे भारतीय जनता पक्षाला संजीवनी मिळाली आहे भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील विविध नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान संपूर्ण आढावा घेतला आणि नांदेड महानगरपालिकेवर भगवा निश्चितपणाने फडकेल असा आशावाद देखील व्यक्त केला.

नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रमुख बूथ कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली.

'विकसित नांदेड' घडवण्यासाठी महानगरपालिकेवर कमळ फुलवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. येणाऱ्या ८ दिवसांत प्रत्येक बूथवर '५१ टक्क्यांची लढाई' जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्णवेळ समर्पित रहावे, असे आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार चव्हाण यांनी केले.

याप्रसंगी खासदार अजित गोपछडे, खासदार अशोक चव्हाण, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ, आमदार भीमराव केराम, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख, डॉ. सचिन उमरेकर, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले, बाळू खोमणे, संतोष पांडागळे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande