
लातूर, 07 जानेवारी (हिं.स.)। लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजेजी भोसल यांची जाहीर सभा सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडली. यावेळी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
मंत्री महोदयांनी लातूर शहराच्या भविष्याचा विकास आराखडा नागरिकांसमोर मांडत पक्षाचे हात आपल्या मतदानरुपी आशीर्वादाने मजबूत करण्याचे आवाहन केले. याचबरोबर शहराला सुरक्षित, समृद्ध व स्वच्छ बनवण्यासाठी भाजपा हाच एकमेव पर्याय असून शहराचा रखडलेला विकास पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी भाजपाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याची विनंती केली.
यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर,माजी खासदार डॉ. सुनिलजी गायकवाड, लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजितजी पाटील कव्हेकर, विश्वजितजी गायकवाड, पक्षाचे उमेदवार प्रियंकाताई गायकवाड, दीपाताई गिते, पवनजी अलटे, तुळसीताई पांचाळ, छायाताई केंद्रे, अण्णासाहेब हिप्परकर आदीसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis