दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास टोल-फ्री समुपदेशन सेवा सुरू!
पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक आणि सामाजिक समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि त्यां
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास टोल-फ्री समुपदेशन सेवा सुरू!


पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)।

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मानसिक आणि सामाजिक समुपदेशन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आणि त्यांचे समुपदेशन करण्यासाठी आता सीबीएसईने एक पाऊल उचलले आहे. या सेवेचा पहिला टप्पा मंगळवारपासून सुरू झाला असून तो एक जूनपर्यंत असणार आहे.परीक्षेसंदर्भातील ताणतणाव कमी करणे, भावनिक स्वास्थ्य जपणे आणि विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षांना आत्मविश्वास, मानसिक संतुलन चांगले ठेवून सामोरे जाता यावे, हा सीबीएसईच्या उपक्रमाचा उद्देश आहे. ताणाचे व्यवस्थापन, प्रभावी अभ्यास पद्धती आणि भावनिक आरोग्य यासंदर्भातील सविस्तर माहिती सीबीएसईच्या ‘www.cbse.gov.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande