चंद्रपूर - आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ४१ देखरेख पथके कार्यरत
चंद्रपूर, 7 जानेवारी, (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आचारसंहिता काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणेमार्फत ४१ विविध देखरेख पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. निवडणू
चंद्रपूर - आचारसंहिता अंमलबजावणीसाठी ४१ देखरेख पथके कार्यरत


चंद्रपूर, 7 जानेवारी, (हिं.स.)। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आचारसंहिता काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन व निवडणूक यंत्रणेमार्फत ४१ विविध देखरेख पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, तसेच बेकायदेशीर प्रचार, रोख रक्कम, मद्य, भेटवस्तू वितरण यांस प्रतिबंध घालण्यासाठी सकाळी ८ व संध्याकाळी ८ अशा एकूण १६ स्थायी निगराणी पथके (Static Surveillance Team – SST) नियुक्त करण्यात आली आहेत.

तसेच तक्रार प्राप्त होताच तत्काळ कारवाई करण्यासाठी सकाळी ५ व संध्याकाळी ५ अशी एकूण १० फिरती पथके (Flying Squad) कार्यरत असून, प्रचार सभा, मिरवणुका व इतर निवडणूक कार्यक्रमांचे चित्रीकरण करण्यासाठी सकाळी ५ व संध्याकाळी ५ अशी एकूण १० व्हिडिओ देखरेख पथके (Video Surveillance Team – VST) कार्यरत आहेत.

या व्हिडिओ चित्रीकरणाच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेल्या चित्रफितींचे परीक्षण करून आचारसंहिता उल्लंघनाची प्रकरणे निष्पन्न करण्यासाठी ५ व्हिडिओ परीक्षण पथके (Video Viewing Team – VVT) कार्यरत ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे निवडणूक आचारसंहिता उल्लंघन निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित पथक किंवा निवडणूक प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande