अमरावती - मतदान केंद्राची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.)। निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करत निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्यासह निवडणूक निर्णय अधिका-यांनी सकाळी स
नवसारी जवळच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये होणार मतगणना मतगणना केंद्राची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी


अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.)।

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करत निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्यासह निवडणूक निर्णय अधिका-यांनी सकाळी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या मतगणना केंद्राच्या कामकाजाची सखोल पाहणी केली.

या पाहणीदरम्यान मतगणना केंद्रावर करण्यात आलेल्या एकूण कामाच्या नियोजनाचा आयुक्तांनी बारकाईने आढावा घेतला. मतगणनेसाठी आवश्यक असलेली भौतिक व्यवस्था, मतमोजणी टेबल्सची मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश व निर्गमन मार्ग, सीसीटीव्ही यंत्रणा, विद्युत व अग्निसुरक्षा व्यवस्था, तसेच आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.

यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतगणना प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असल्याने कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा अथवा त्रुटी होऊ नये, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने काम करावे, असे निर्देश दिले. मा.राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून मतगणना प्रक्रिया पार पाडण्यावर त्यांनी विशेष भर दिली.

पाहणीनंतर आयुक्तांनी स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत मतगणना प्रक्रियेतील विविध टप्पे, वेळेचे नियोजन, समन्वय, माहिती संप्रेषण, तसेच तक्रारींच्या निवारणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मतगणना प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने पार पडण्यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

तसेच, मतगणनेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवण्याचे, तसेच प्रसारमाध्यमे व उमेदवारांच्या प्रतिनिधींना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

प्रशासनामार्फत मतगणना प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या पाहणी व बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती श्रद्धा बबन उदावंत, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती दुर्गा देवरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी तथा वन जमाबंदी अधिकारी विवेकानंद काळकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त दादाराव डोलारकर, विविध खात्यांचे विभागप्रमुख, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande