छ.संभाजीनगर - धारला येथे फुलांची उधळण, आतषबाजीने श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाने अवतरले गोकुळ
छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.)। धारला येथे सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद्भागवत कथेत श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण आणि भक्तिगीतांच्या तालावर नृत्य करणाऱ्या भाविकांमुळे संपूर्ण धार
छ.संभाजीनगर - धारला येथे फुलांची उधळण, आतषबाजीने श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहाने अवतरले गोकुळ


छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.)।

धारला येथे सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद्भागवत कथेत श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण आणि भक्तिगीतांच्या तालावर नृत्य करणाऱ्या भाविकांमुळे संपूर्ण धारलानगरीत जणू गोकुळच अवतरल्याचा भास

झाला.

या विवाह सोहळ्यासाठी भगवान श्रीकृष्ण व रुक्मिणी यांची सजीव आरास साकारण्यात आली होती. श्रीकृष्ण व रुक्मिणी यांच्या भूमिकेत अंकिता जगन जाधव व साक्षी विष्णू साबळे या युवतींनी साकारलेली वेशभूषा उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली. सोहळा सुरू होताच धर्ममंडपातून व्यासपीठाकडे येताना या दोघांवर भाविकांनी फुलांची उधळण करत जल्लोषात

स्वागत केले. अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद्भागवत कथेच्या या पर्वात भागवताचार्य ह.भ.प. श्रीरामजी महाराज निकम यांनी आपल्या अमृतमय वाणीतून भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला, चरित्र व त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्याचे प्रभावी निरूपण केले. दुपारच्या सत्रात श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाहावर केलेल्या निरूपणानंतर प्रत्यक्ष विवाह सोहळा रंगतदार वातावरणात पार पडला.

विवाहानंतर महिला भाविकांनी

श्रीकृष्ण-रुक्मिणी यांचे पूजन व औक्षण केले. सामूहिक महाआरतीनंतर 'जय जय श्रीकृष्ण'च्या गजराने परिसर दुमदुमून गेला. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande