अमरावती - शक्ती महाराज राष्ट्रवादीच्या प्रचारात
अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.) अमरावतीत शहरात कट्टर हिंदू समर्थक म्हणून ख्याती असलेले व भाजपच्या अनेक आंदोलनात हिरीरीने सहभाग घेत असलेले डॉ.शक्ती महाराज आज भाजप सोडून अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करतांना दिसत आहे. तिकीट वाटपाच्या वेळी
भाजप विरोधात डॉ.शक्ती महाराज उतरले प्रचारातकरत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट


अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.) अमरावतीत शहरात कट्टर हिंदू समर्थक म्हणून ख्याती असलेले व भाजपच्या अनेक आंदोलनात हिरीरीने सहभाग घेत असलेले डॉ.शक्ती महाराज आज भाजप सोडून अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करतांना दिसत आहे.

तिकीट वाटपाच्या वेळी भाजप च्या काही पदाधिकाऱ्यांनी शक्ती महाराज यांच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्यांच्या तिकीट नाकारल्या याचा जाब शक्ती महाराज यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना विचारला असता त्यावेळी भाजप पदाधिकारी व शक्ती महाराज यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला त्यानंतर शक्ती महाराज यांनी भाजप विरोधात आपला मोर्च्या उघडला राजकमल चौकात भाजप पदाधिकारी यांच्या विरोधात आंदोलन पुकारले होते. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्व पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी यांच्या प्रचाराचा धुराळा उडत असतांना भाजप विरोधात जोरदार प्रचार करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande