
त्र्यंबकेश्वर, 07 जानेवारी (हिं.स.)।
सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वरला अतिकमण, रहदारीला अडथळा ठरत असलेले बांधकाम तोडफोडीला प्रारंभ झाला आहे. या मोहिमेला प्रारंभ झाला. त्र्यंबकेश्वर-इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी जी. एस. टी. प्रणव दत्ता आणि तहसलीदार गणेश जाधव पाटील यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील मांस, मच्छीची दुकाने हटवली. त्यानंतर त्र्यंबकेश्वर शहरातील टॅक्सी स्टँडजवळ असलेले मटण विक्रीची दुकाने बंद केली. जेसीबीच्या मदतीने ओटा तोडला. त्यानंतर निवृत्तिनाथ रस्त्यावर असलेले सुकी मासळी विक्री दुकानावर हातोडा चालवला.
यावेळी हातगाड्या आणि टपरी ट्रॅक्टरमध्ये टाकून नगरपरिषदेच्या गोदामात जमा केले. यावेळी नगरपरिषदेचे कर अधिकारी विजय सोनार आणि पथक उपस्थित होते. कर अधिकारी विजय सोनार यांनी दुकानांची माहिती जिल्हा प्रशासन अधिकार्यांना दिली. कर अधिकारी विजय सोनार यांनी मांस, मच्छी विक्री करणार्या व्यावसायिकांना अगोदर पूर्वकल्पना देण्यात आलेली होती. तशी नोटीस बजावण्यात आलेली असल्याचे स्पष्ट केली. दरम्यान, ग्रामीण भागातील एका जमीनमालकाने आपल्याला कोणतीही नोटीस नव्हती असे सांगितले आहे. संत निवृत्तिनाथ यात्रा आणि सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवर मांस, मच्छी विक्री दुकानांना बंदी केल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV