
परभणी, 07 जानेवारी (हिं.स.)। निसर्गाचा समतोल ढासळण्यासाठी मानवी हस्तक्षेप कारणीभूत ठरत आहे, हा समतोल कायम ठेवण्यासाठी निसर्गाचे संवर्धन करणे, वृक्षारोपण करणे, विविध नैसर्गिक अधिवास अबाधित ठेवण्याचे कार्य झाले पाहिजे, पशु पक्षी यामधील पक्षी हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून, पक्षी वाचला तर निसर्ग वाचेल, निसर्ग वाचला तर मनुष्य वाचेल, असे मत प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी व्यक्त केले.
येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्यावतीने राष्ट्रीय पक्षी दिनानिमित्त अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रविणकुमार पवार, प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा. अनिता जिंतुरकर, प्रा. अजय जाधव, प्रा. भैय्यासाहेब जाधव यांची उपस्थिती होती. शहरातील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाच्यावतीने राष्ट्रीय पक्षी दिनानिमित्त 5 जानेवारी हा पक्षी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पक्षांच्या अधिवास संरक्षणासाठी झाडांवर पाणी व खाद्य ठेवणे, पक्षाी चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित केली होती, यामध्ये एकुण 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रा. प्रविणकुमार पवार यांनी मार्गदर्शन केले तर मेघा शिंदे, शितल शिंदे, दुर्गा कांबळे, पुनम रोडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन विद्या शिंदे, प्रास्ताविक वैष्णवी काटे तर आभार वैष्णवी आपेट हिने व्यक्त केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis