
छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.)
कन्नडमध्ये उपनगराध्यक्षांसह तीन स्वीकृत सदस्यांची निवड १३ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली.
नगरपालिकेत २ डिसेंबर रोजी मतदान झाले. २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाला. कन्नड नगरपालिकेत नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. आता उपनगराध्यक्षांसह तीन स्वीकृत सदस्यांची निवड १३ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी दिली आहे.
त्यांनी सांगितले की, सोमवार, १३ जानेवारी रोजी उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक यांची निवड करण्यासाठी पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा शेख फरीन बेगम अब्दुल जावेद यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis