भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.)। - भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे सी.डी.एस. (Combined Defence Servi
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी


सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.)।

- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे सी.डी.एस. (Combined Defence Services) कोर्स क्र. 66 आयोजित करण्यात आला आहे. हा कोर्स दिनांक 19 जानेवारी ते 3 एप्रिल या कालावधीत पार पडणार असून प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीस हजर राहणे आवश्यक आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवरून CDS-66 कोर्ससाठी प्रवेशपत्र व परिशिष्टांची प्रिंट काढून पूर्ण भरून सोबत आणणे बंधनकारक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande