
नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूकीत प्रभाग क्र.१५ मधील मतदार बंधू-भगिनीशी संवाद आणि प्रचार कार्यालयाचे उदघाटन शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केले. महानगरपालिका निवडणुकी अंतर्गत आज सराफा भागातील नरहरी मंदिरात मतदार बंधू-भगिनी सोबत संवाद साधला , शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तुलजेश यादव,नीलम यादव ,पूजा फाटले,सत्यजित डोईफोडे यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती.प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.बैठकीत सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.यावेळी दिपकराव बोधने, अच्युतराव जगताप, नारायणराव कुलथे, रवी डोई फोडे, ललित कुलथे,गणेश अर्धापुरकर, शेलुसिंग चव्हाण,यांच्यासह महिला भगिनी संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis