सोलापूर- प्रभाग २५ मध्ये बदलाचे वारे
सोलापूर, ०७ जानेवारी (हिं.स.) आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांकडून आता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) य
सोलापूर- प्रभाग २५ मध्ये बदलाचे वारे


सोलापूर, ०७ जानेवारी (हिं.स.) आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला कंटाळलेल्या नागरिकांकडून आता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या धनुष्यबाण चिन्हाला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

प्र

भाग क्रमांक २५ मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट)कडून धनंजय रामचंद्र कारंडे व शोभा प्रभाकर चौगुले हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. परिसरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडक्या बहिणी’कडून उमेदवारांचे स्वागत करण्यात येत असून प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे.

मंगळवारी हत्तूरे वस्ती परिसरातून काढण्यात आलेल्या पदयात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या पदयात्रेदरम्यान उमेदवार धनंजय कारंडे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या भावना आणि समस्या जाणून घेतल्या.

मागील पाच वर्षांत मूलभूत सुविधांच्या अभावामुळे निराश झालेल्या नागरिकांनी पाणी, रस्ते, स्वच्छता आदी प्रश्नांचा पाढा वाचला. यावेळी नागरिकांना आश्वासन देताना धनंजय कारंडे म्हणाले, “तुम्ही माझ्यासोबत ठामपणे उभे रहा. येणाऱ्या काळात या भागात निश्चितपणे सकारात्मक बदल घडवून आणू.”

या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक २५ मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

----------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande