अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर कडक कारवाई व्हावी
अखिल भारतीय ग्राहक पंचायतची आरटीओकडे मागणी नागपूर, 07 जानेवारी (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कुठलेही दरपत्रक ठरविले नसतानाही काही व्यावसायिक आणि खाजगी गाडी मालक प्रवाशांकडून अवैध पद्धतीने पैसे घेत आहेत, अशी गंभीर चिंता अखिल भारतीय ग्राह
अ.भा. ग्राहक पंचायत लोगो


अखिल भारतीय ग्राहक पंचायतची आरटीओकडे मागणी

नागपूर, 07 जानेवारी (हिं.स.) : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कुठलेही दरपत्रक ठरविले नसतानाही काही व्यावसायिक आणि खाजगी गाडी मालक प्रवाशांकडून अवैध पद्धतीने पैसे घेत आहेत, अशी गंभीर चिंता अखिल भारतीय ग्राहक पंचायतने व्यक्त केली आहे. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे यांनी आरटीओ आणि वाहतूक उप-आयुक्तांकडे या गाडी मालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात पांडे म्हणाले की, तवेरा, इन्होव्हा, स्विफ्ट डिझायरसारख्या गाड्या मालक 13 ते 16 रुपये प्रति किलोमीटर दराने प्रवासी वाहतूक करतात आणि कमीतकमी 300 किलोमीटर चालण्याची अट लावतात, जे नियमविरुद्ध आहे. पूर्वी ही कमीतकमी अंतराची अट 200 किलोमीटर होती. प्रशासनाची दुर्लक्षामुळे प्रवाशांना बिनधास्तपणे मनमानी रितीने पैसे द्यावे लागत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. ग्राहक पंचायतने रुग्ण वाहतुकीसाठी ऍब्युलन्स आणि शहरांतील ऑटो मिटरच्या दरपत्रकाची उदाहरणे दिली, पण प्रत्यक्षात नियम पाळले जात नसल्याचा अनुभव प्रवाशांनी सांगितला आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा खाजगी गाडी मालकांना व्यावसायिक परवानगी दिलेली नाही, त्यामुळे ही वाहतूक अवैध आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतने स्पष्ट केले आहे की, नियम पाळून प्रति किलोमीटर दरपत्रक ठरवून प्रवासी वाहतुकीची व्यवस्था व्हावी आणि कोणत्याही अंतराची अट लागू न करता प्रवाशांना सेवेसाठी उपलब्धता असावी. तसेच शासनाचे नियम मोडून प्रवाशांची लूट करणाऱ्या व्यावसायिक आणि खाजगी गाडी मालकांवर कठोर कारवाई करावी, असे त्यांनी आरटीओ व वाहतूक उप-आयुक्तांना पत्रकाद्वारे मागणी केली आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande