पुणे -भाजपने काढली नाराजांची समजूत
पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज प्रमुख कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना ‘प्रभाग प्रभारी’ पदाची जबाबदारी दिली आहे. या प्रभारींनी त्या प्रभागातील निवडणूक यंत्रणा लावणे, बूथ यंत्रणा लावण्य
bjp


पुणे, 07 जानेवारी (हिं.स.)पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज प्रमुख कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना ‘प्रभाग प्रभारी’ पदाची जबाबदारी दिली आहे. या प्रभारींनी त्या प्रभागातील निवडणूक यंत्रणा लावणे, बूथ यंत्रणा लावण्यासह नाराज मतदारांना भेटणे, अन्य पक्षातील महत्त्वाचे प्रवेश करून घेऊन चारीही उमेदवार निवडणूक आणण्याची जबाबदारी दिली आहे. तुमच्या अनुभवाचा वापर या निवडणुकीत करा अशी सूचना देण्यात आली आहे.पुणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्व प्रभागात प्रचाराला सुरुवात झाली असली तरी भाजपमध्यील अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची ऐनवेळी उमेदवारी कापली गेल्याने पक्षात अद्यापही नाराजी आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार सुरु झालेला असला तरी पक्षाची यंत्रणा प्रचारात उतरलेली नाही. चारच्या प्रभागामुळे लाखभर मतदारांपर्यंत इतक्या कमी दिवसात पोचू शकत नसल्याने उमेदवारांचे टेंशन वाढले आहे. भाजपने १२५ जागांचे लक्ष्य ठेवलेले असले तरी अनेक ठिकाणचे उमेदवार धोक्यात आहेत, काही ठिकाणी विरोधकांकडून जोरदार लढत दिली जाऊ शकते अशा माहिती पक्षाकडे येत आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा बऱ्याच कमी जागा निवडून येण्याची शक्यता भाजपच्या यंत्रणेकडून वर्तवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande