ठाकरे बंधूंची भूमिका भेदभावाची; महायुतीची बंधूभावाची - रामदास आठवले
मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.) - मुंबई महानगरपालिका निवडणुकित राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांनी भाषिक भेदभाव आणि प्रांतभेदभावाची भुमिका मांडुन मुंबईतील वातावारण प्रदुषित करण्याचा प्रयत्न चालवला आहे.मुंबईत भेदभावाचे वातावरण ठाकरे बंध
रामदास आठवले


मुंबई, 07 जानेवारी (हिं.स.) - मुंबई महानगरपालिका निवडणुकित राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांनी भाषिक भेदभाव आणि प्रांतभेदभावाची भुमिका मांडुन मुंबईतील वातावारण प्रदुषित करण्याचा प्रयत्न चालवला आहे.मुंबईत भेदभावाचे वातावरण ठाकरे बंधुना करायचे आहे.ठाकरे बंधुची भुमिका जरी भेदभावाची असली तरी रिपब्लिकन पक्षाची आणि महायुतीची भुमिका बंधुभावाची आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

मराठी ही आमची मातृभाषा आहे .आम्हाला मराठीचा अभिमान आहे.मराठी माणसासोबत उदरनिर्वाहसाठी आलेल्या परप्रांतीयांना सुद्धा रोजी रोटी देणारी मुंबापुरी ही भारताची आर्थिक राजधानी आहे.मुंबईच्या जडणघडणीत गरिब कष्टकऱ्यांचे मोठे योगदान आहे. आम्हाला कोणताही भेदभाव करायचा नाही.आपण सर्व भारतीय आहोत;याचा आपल्याला असला पाहिजे.मुंबई ही विविधतेने नटलेली आहे.या मुंबई मध्ये भेदभाव नाही तर बंधुभाव वाढवायचा आहे. बंधुभावातुनच एकमेकांचा विश्वास वाढवायचा आहे. रिपब्लिकन पक्षाच्या या बंधुभावाच्या भुमिकेला मुंबईतील जनता भरभरुन साथ देईल, असा विश्वासआठवले यांनी व्यक्त केला.

मुंबई अंधेरी येथे वॉर्ड क्र ६५ चे रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार जयंतीलाल गडा यांच्या निवडणुक प्रचार कार्यालयाला भेट दिल्या नंतर ना.रामदास आठवले यांनी जयंतीलाल गडा यांना विजयी करण्याचे आवाहन केले.त्यावेळी आठवले बोलत होते.

ना.रामदास आठवले यांनी अंधेरी,धारावी या भागांचा दौरा करुन रिपब्लिकन उमेदवारांचा प्रचार केला.रिपब्लिकन पक्षाच्या धारावीतल वॉर्ड क्रमांक १८६ च्या कुमारी स्नेहा सिध्दर्थ कासारे यांच्या ही प्रचार कार्यलयाचे उद्घाटन या धारवी येथे करण्यात आले.त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई राज्यसरचिटनीस गौतम सोनावणे,मुंबई अध्यक्ष सिध्दर्थ कासारे,जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.

मुंबई शहराचा विकास होत आहे आणि त्यांच बरोबर लोकसंख्या ही वाढत आहे.मुंबई मध्ये मोठ-मोठे ब्रिज,उंच-उंच इमारती उभे करण्याचे जे कष्टकऱयांचे जे हात आहे.ते कष्टकरी जसे मराठि आहेत तसेच परप्रांतीय आहे.परंतु मराठी आणि परप्रांतीय असा भेदभाव कोणी करू नये.भेदभावाचे विष समाजामध्ये कोणी कालवू नये.जाती भेद,धर्म भेद,प्रांत भेद, भाषा भेद या भेदभावाच्या विषारी विचारातुन समाज मन कलुषित करू नये .महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला समता,स्वातंत्र्य बंधुतेचा विचार दिला आहे.तोच बंधुत्वाचा विचार घेऊन रिपब्लिकन पक्ष काम करित आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतले आहे.उत्तर भारतील,दक्षिण भारतीय,गुजराती,मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समतेच्या दृष्टीने रिपब्लिकन पक्ष बघतो.म्हणुन जयंतीलाल गडा सारख्या गुजराती माणसाला रिपब्लिकन पक्षाने उमेदवारी दिली आहे.महायुती मध्ये जरि रिपब्लिकन पक्ष असला तरी भाजपने रिपब्लिकन पक्षाला एक ही जागा दिलेली नाही .त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने मुंबई शहरात स्व:बळावर 12 उमेदवार मैदानात उतरविले आहेत.मुंबईतील बाकी 215 जागांवर भाजप,शिवसेना महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे.

राज ठाकरे,उध्दव ठाकरे हे भेदभावची भूमिका मांडत आहेत.रिपब्लिकन पक्ष आणि महायुती ही बंधुभावाचा विचार पेरत आहे.त्यामुळे या निवडणुकीमध्ये भेदभावाचा पराभव होईल आणि बंधुभावाचा विजय होईल.त्यातुनच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार स्व:बळावर निवडून येतील. तसेच रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्यामुळे महायुती चा मुंबईत महापौर होईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande