प्रशासन व पत्रकार यांच्यात चांगला समन्वय असावा - सोलापूर जिल्हाधिकारी
सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.)। मागील अडीच वर्षापासून जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमे विशेषतः महसूल बीट प्रतिनिधी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला खूप सहकार्य मिळालेले आहे. त्यामुळे मागील वर्षी आलेली पूर परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळणे शक्य झाले. जिल्ह्
Ptrak


सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.)। मागील अडीच वर्षापासून जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमे विशेषतः महसूल बीट प्रतिनिधी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला खूप सहकार्य मिळालेले आहे. त्यामुळे मागील वर्षी आलेली पूर परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळणे शक्य झाले. जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न व कामांमध्ये प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्याकडून वेळोवेळी माहिती मिळत गेल्याने त्यात आवश्यक बदल करून ती कामे मार्गी लावण्या प्रशासनाला मदत झाली. त्यामुळे प्रशासन व पत्रकार यांच्यात पुढील काळात ही चांगला समन्वय असावा, असे मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित महसूल बीट प्रतिनिधी यांचा पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, मराठी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक संचारचे प्रतिनिधी विक्रम खेलबुडे, दैनिक पुण्यनगरी चे महेश पांढरे, लोकमतचे बाळकृष्ण दोड्डी, सकाळचे प्रमोद बोडके, तरुण भारतचे अविनाश गायकवाड, तरुण भारत संवाद चे संतोष आचलरे, एबीपी माझाचे आफताब शेख, टीव्ही नाईन चे सागर सुरवसे त्यांच्यासह महसूल बीट चे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद हे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता चांगली असून ते प्रशासनाला नेहमी सहकार्य करत असतात. मागील अडीच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत असताना पत्रकारांनी सहकार्याची भूमिका ठेवली व पुढे ही अशीच भूमिका कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच मागील वर्षी माझी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्या पूर परिस्थितीमध्ये प्रशासन चांगल्या प्रकारे काम करून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे व तसेच पुरात अडकलेल्या अनेक नागरिकांना बचाव पथकामार्फत बचाव करण्यात प्रशासन यशस्वी झाले. यावेळी प्रसार माध्यमाने प्रशासनाशी सहकार्याची भूमिका ठेवल्याने प्रशासनाला अधिक गतीने काम करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

आषाढी व कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यामध्ये प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचाही स्वीकार करून त्या पद्धतीने प्रशासनाने काम केले. वारीचे नियोजन ही त्यामुळे उत्कृष्ट झाले. तसेच होटगी रोड विमानतळ येथून विमानसेवा सुरू करणे, बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवणे, आयटी पार्क जागा निवडून सुरू करणे, पंढरपूर येथील कॉरिडॉर अशा अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांमध्ये प्रसार माध्यमाने प्रशासनाशी सहकार्य पूर्ण भूमिका बजावली, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व महसूल बीट प्रतिनिधी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले तर आभार सकाळचे प्रतिनिधी प्रमोद बोडके यांनी मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande