
आठ साखर कारखान्यांत उसाचे गाळप सुरू
छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.)।
यावर्षीच्या जोरदार आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना विशेषतः ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे छत्रपती संभाजी नगर
जिल्ह्यात ६० दिवसांत १३ लाख ३९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन; उतारा ८.८८ टक्के आहे
जिल्ह्यात सन २०२५-२६ या हंगामात आठ साखर कारखाने उसाचे गाळप करीत आहेत. या कारखान्यांनी आतापर्यंत एकूण १५ लाख ७ हजार १४४ मॅट्रिक टन उसाचे गाळप केले असून १३ लाख ३९ हजार ८० क्विंटल साखरेचे उत्पादन केलेले आहे. सरासरी साखर उतारा ८८८% आला आहे.
जिल्ह्यात या वर्षी मुक्तेश्वर शुगर मिल्स शेंदुरवादा गंगापूर, बारामती अॅग्रो कन्नड, छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग चित्तेपिंपळगाव, घृष्णेश्वर शुगर खुलताबाद, पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड महालगाव वैजापूर या पाच खासगी तर जय हिंद शुगर (भाडेतत्त्वावर गंगापूर सहकारी साखर कारखाना रघुनाथ नगर गंगापूर), सचिन घायाळ पैठण (सहयोगी तत्त्वावर
श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना) रेणुकादेवी सहकारी साखर कारखाना विहामांडवा या तीन सहकारी अशा एकूण आठ साखर कारखान्यांनी ऊस गाळपास प्रारंभ केला आहे. तांत्रिक कारणामुळे सिल्लोडचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू होऊ शकला नाही, तर फुलंब्रीचा देवगिरी सहकारी साखर कारखाना या वर्षीच ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. मागच्या वर्षी पंचगंगा शुगर हा उशिरा सुरू झाला होता तर जय हिंद शुगर आणि घृष्णेश्वरचे गाळप सुरू होऊ शकले नव्हते. या वर्षी मात्र पाच खासगी व तीन सहकारी साखर कारखाने जोमाने ऊस गाळप करीत आहेत. मागील नोव्हेंबर व डिसेंबर २०२५ या दोन महिन्यांत तीन सहकारी साखर कारखान्यांनी दोन लाख ४२ हजार ४८१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १ लाख ७० हजार ६९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत जास्त म्हणजे ४ लाख ३३ हजार चारशे चाळीस मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ लाख ७३ हजार ६९० क्विंटल साखरेचे उत्पादन करून महालगाक्चा पंचगंगा शुगर हा पहिला खासगी साखर कारखाना ठरला आहे.
यंदाचा पावसामुळे उसाची वाढ झाल्याने वजनही वाढले आहे. त्यामुळे या वर्षी जिल्ह्यात साखर उत्पादनात वीस ते पंचवीस टक्के वाढअपेक्षित आहे. असे सांगितले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis