
नाशिक, 07 जानेवारी (हिं.स.)।
- महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या स्ट्राईक रेट हा सगळ्यांच्या पुढे असेल यात तुम्ही मात्र शंका नाही असे सांगून खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की महानगरपालिकेवरती शिवसेनेचाच भगवा फडकेल.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी प्रचार रॅलीचे आयोजन केलेले होते ही प्रचार रॅली पंचवटीतील श्री काळाराम मंदिर येथून सुरुवात झाली. खासदार श्रीकांत शिंदे हे पंचवटीतील काळाराम मंदिर या ठिकाणी पोहचले त्यांनी तिथे दर्शन घेतले यांच्यासमवेत भाऊ चौधरी, हेमंत गोडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख व उपनेते अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकेल या कोणतीही शंका नाही या ठिकाणी शिवसेना उमेदवारांचा प्रचार हा शिगेला पोहोचलेला आहे. मतदारही शिवसेनेला पसंती देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, अकोटआणि अंबरनाथ या ठिकाणी जे काही प्रकार झाले त्यावर बोलताना याबाबत भाजपाने उत्तर दिले पाहिजे असे सांगून अधिक बोलणे त्यांनी स्पष्टपणे टाळले आम्ही नेहमीच काँग्रेस विरोधी आहे आणि काँग्रेस विरोधी राहिलो आजही आम्ही काँग्रेसच्या विरोधात आहे त्यामुळे आमचा विरोध हा काँग्रेसला कायम असेल आम्ही काँग्रेसबरोबर जाणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगरपालिका निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेनेचा स्ट्राइक रेट हा सगळ्यात जास्त होता आता तो स्ट्राईक रेट होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये देखील सर्वांच्या पुढे असेल यामध्ये कोणतीही शंका नाही राज्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीप्रमाणे विकासाचे कार्य सुरू आहे विकासाला गती मिळत आहे त्यावर लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर तीच महानगरपालिकांमध्ये आम्ही सर्वप्रथम राहू असा विश्वास व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे गेलो आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV