परभणी : पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल भाजपच्या सहा जणांची हकालपट्टी
परभणी, 07 जानेवारी (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या पक्षविरोधी भूमिका संघटनात्मक नियमांचे उल्लंघन आणि पक्षाच्या प्रतिमेला बाधा पोहोचविणाऱ्या गंभीर कृत्यामुळे पक्षाच्या शिस्त समितीने स्वप्निल पिंगळकर पारदेश्वर मंदिर मंडळाध्यक्ष, लक्ष्मीकांत क्षीरसाग
परभणी : पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल भाजपच्या सहा जणांची हकालपट्टी


परभणी, 07 जानेवारी (हिं.स.)।

भारतीय जनता पक्षाच्या पक्षविरोधी भूमिका संघटनात्मक नियमांचे उल्लंघन आणि पक्षाच्या प्रतिमेला बाधा पोहोचविणाऱ्या गंभीर कृत्यामुळे पक्षाच्या शिस्त समितीने स्वप्निल पिंगळकर पारदेश्वर मंदिर मंडळाध्यक्ष, लक्ष्मीकांत क्षीरसागर पदाधिकारी, राजेश देशपांडे प्रदेश कार्यकारणी सदस्य, दिनेश नरवाडकर पदाधिकारी, सुमित भालेराव अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि ओम मुदीराज अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष यांचे विरुद्ध पक्षशिस्तीचा भंग करून पक्ष हिताच्या विरोधात जाणीवपूर्वक कृती केल्याचे निदर्शनास आल्याने पक्षाच्या संविधानातील तरतुदीनुसार त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाची कार्यवाही पक्ष स्तरावर सुरू करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande