
सोलापूर, 7 जानेवारी (हिं.स.)। महावितरणने वीज बिल थकबाकीदारांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती परिमंडळात घरगुती, वाणिजिक्य व औद्योगिक वर्गवारीतील 5 लक्ष 22 हजार ग्राहकांकडे 106 कोटी 22 लाख रूपये वीजबिलांची थकबाकी आहे. बारामती परिमंडळात चालू डिसेंबर महिन्यात 10 हजार 378 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
'वीजबिलांच्या थकबाकीत बारामती मंडळात 1 लाख 18 हजार ग्राहकांकडे 27 कोटी 65 लाख रूपये, सातारा मंडळात 1 लाख 77 हजार ग्राहकांकडे 23 कोटी 80 लाख रूपये, तर सोलापूर मंडळात 2 लाख 27 हजार ग्राहकांकडे 54 कोटी 76 लाख रूपये थकीत आहेत. वीजबिल थकबाकीपोटी बारामती मंडळातील 2702, सातारा मंडळातील 778 तर सोलापूर मंडळातील 5490 ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे.महावितरणने ग्राहकांना महावितरणच्या संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल ॲपद्वारे वीजबिले भरण्याची तसेच तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला असल्यास पुनर्जेाडणी शुल्कापोटी सिंगल फेजकरिता 310 रुपये, थ्री फेजकरिता 520 रुपये व अधिक जीएसटीसह भरावे लागणार आहे, अशी माहिती महावितरणने दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड