
सोलापूर, 07 जानेवारी (हिं.स.) । पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडील सन २०२५–२०२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थींनी २४ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय), जिल्हा परिषद सोलापूर डॉ. व्ही. डी. येवले यांनी केले आहे.
या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून, संबंधित अर्ज दिनांक ५ जानेवारी २०२६ पासून पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती कार्यालये तसेच सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय, अर्ज जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.zpsolapur) देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी २०२६ असून, इच्छुक व पात्र लाभार्थींनी विहित मुदतीत अर्ज सादर करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष, कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, जिल्हा परिषद सोलापूर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपाध्यक्ष कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर आणि जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. व्ही. डी. येवले यांनी संयुक्तपणे केले आहे.------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड