नांदेडच्या बिलोलीत उपनगराध्यक्ष पदाचा ९ जानेवारीला होणार फैसला
नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)। नगरपालिकेच्या चुरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीत मराठवाडा जनहित पार्टीने यश संपादन केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना बाजूला करत संतोष कुलकर्णी यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. आता सर्वांचे ल
नांदेडच्या बिलोलीत उपनगराध्यक्ष पदाचा ९ जानेवारीला होणार फैसला


नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.)। नगरपालिकेच्या चुरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीत मराठवाडा जनहित पार्टीने यश संपादन केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना बाजूला करत संतोष कुलकर्णी यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. आता सर्वांचे लक्ष उपनगराध्यक्ष निवडीकडे लागले आहे. दरम्यान नगराध्यक्ष कुलकर्णी यांनी ९ जानेवारी रोजी पहिली सभा बोलावली असून या सभेत उपनगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

२० जागांपैकी १४ जागा जिंकून 'मजपा' ने बहुमत मिळवले. त्यातच अपक्ष नगरसेवक शिवाजी गायकवाड यांनी मजपला पाठिंबा दिल्याने पक्षाचे संख्याबळ १५ वर गेले. दुसरीकडे काँग्रेसला केवळ ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ (अजित पवार गट) जागेवर समाधान मानावे लागले.

या पदासाठी पक्षातर्फे चार ज्येष्ठ नगरसेवकांची नावे चर्चेत असून यामध्ये यशवंत गादगे, अनुप अंकुशकर, आम्रपाली पोवाडे व नितीन देशमुख यांचा समावेश आहे. तसेच उपनगराध्यक्ष पदासोबतच दोन स्वीकृत सदस्यांचीही निवड केली जाणार आहे. दोन जागांसाठी पक्षाकडे सुमारे १५ ते २० इच्छुकांनी अर्ज केले आहेत. निवडणुकीत पक्षाला पडद्यामागून सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande