
नांदेड, 7 जानेवारी, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत लोहा नगरपरिषद निवडणुकीमध्ये नेतृत्वाखाली निवडून आलेले नगराध्यक्ष शरद नामदेवराव पवार यांचा पदग्रहण सोहळा नगर परिषद, लोहा येथे पार पडला.
पदग्रहण सोहळा पार पडण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, जुना लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, नगर परिषद परिसरातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली काढण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन चिटणीस मुक्तेश्वरराव धोंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, लोहा नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, यांच्यासह नगरपरिषद निवडणुकीमध्ये विजय झालेले सर्व नगरसेवक, नगरसेविका आदिची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis