कळंबोली प्रभागात राजकीय हालचाल; विजया कदम यांचा भाजपला पाठिंबा
रायगड, 07 जानेवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोली प्रभाग क्रमांक ८ (क) मधील राजकीय समीकरणात महत्त्वपूर्ण बदल घडून आला आहे. या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या स्त्री शक्ती फाउंडेशनच्
Bjp


रायगड, 07 जानेवारी (हिं.स.)।

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोली प्रभाग क्रमांक ८ (क) मधील राजकीय समीकरणात महत्त्वपूर्ण बदल घडून आला आहे. या प्रभागातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा विजया चंद्रकांत कदम यांनी भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा देत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. याबाबतचे पाठिंबापत्र त्यांनी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.

विजया कदम या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण तसेच स्थानिक नागरी विकासाच्या क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल व कळंबोली परिसरात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांवर आपला ठाम विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाशिवाय, पूर्ण वैचारिक स्पष्टतेने आणि स्वेच्छेने स्त्री शक्ती फाउंडेशनचा भाजपला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

हा पाठिंबा स्वाभिमान, जबाबदारी, पारदर्शकता आणि जनहित या मूल्यांवर आधारित असून, पनवेल व कळंबोलीच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक आणि विकासाभिमुख राजकारण आवश्यक असल्याचे मत विजया कदम यांनी व्यक्त केले. पनवेल महापालिका निवडणुकीत नागरिकांनी एकत्र येऊन विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या जाहीर पाठिंब्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील तसेच भाजप व महायुतीच्या उमेदवारांनी विजया कदम व स्त्री शक्ती फाउंडेशनचे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उमेदवार अमर पाटील, बबन मुकादम, रविंद्र भगत, राजेंद्रकुमार शर्मा, विजय खानावकर, बायजा बारगजे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande