अमरावती - प्रचारासाठी मैदानाच्या बुकिंगवरून रस्सीखेच
अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.)आगामी १५ जानेवारीला होणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. प्रचाराची सुरुवात आधीच सुपर संडे''च्या माध्यमातून झाली असून, त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फड
सभा होणार कुणाची? मैदान बुकिंगवरून रस्सीखेच युवा स्वाभिमान पक्षासाठी सहा दिवस दसरा मैदान राखीव


अमरावती, 07 जानेवारी (हिं.स.)आगामी १५ जानेवारीला होणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. प्रचाराची सुरुवात आधीच सुपर संडे'च्या माध्यमातून झाली असून, त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो तसेच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची अकॅडमिक हायस्कूलच्या मैदानावर सभा पार पडली.

आता १३ जानेवारीपर्यंत विविध पक्षांचे प्रमुख नेते शहरात दाखल होण्याची शक्यता असून, उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठ्या सभांचे आयोजन केले जात आहे. मात्र, प्रचारादरम्यान प्रतिस्पर्धी पक्षांना सभा घेण्यासाठी मैदान उपलब्ध होऊ नये, या उद्देशाने काही पक्षांकडून सामाजिक किंवा अन्य कार्यक्रमांच्या नावाखाली आधीच मैदान आरक्षित करण्याची रणनीती अवलंबली जात असल्याचे चित्र आहे.सध्या शहरातील प्रमुख मैदानांपैकी फक्त दसरा मैदान आरक्षित करण्यात आले असून, सायन्सकोर मैदान आणि अकॅडमिक मैदान हे ५ ते १३ जानेवारीदरम्यान अद्याप कोणत्याही पक्षाकडून आरक्षित करण्यात आलेले नाहीत.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अखत्यारित असलेल्या दसरा मैदानाच्या आरक्षणाची जबाबदारी प्रसाद पाटणे यांच्याकडे आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने एका सामाजिक कार्यक्रमाच्या नावाखाली १० ते १५ जानेवारीदरम्यान दसरा मैदान आरक्षित करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे १० जानेवारीपासून निवडणूक प्रचार संपेपर्यंत दसरा मैदान इतर कोणत्याही पक्षासाठी उपलब्ध राहणार नाही. सायन्सकोर मैदान आणि अकॅडमिक मैदान हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारित येतात. नेहरू मैदान हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात असून, त्या मैदानासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून एनओसी देण्यात येते. तर अमरावती-बडनेरा मार्गावरील दशहरा मैदान हे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अखत्यारित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande