
लातूर, 07 जानेवारी (हिं.स.)।
ग्रामीण भागातील खेळाडू देशपातळीवर गेले पाहिजे यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. मागील काळात क्रीडा विभागाचा मंत्री म्हणून खेळाडूंसाठी भरीव निधीची तरतूद करून खेळाडू व प्रशिक्षकासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. आपल्या
ग्रामीण भागात कुस्तीला महत्त्व असून उदगीर शहरात स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेऊन कुस्ती स्पर्धेला मोठे बळ निर्माण करून देण्याचे भाग्य मला लाभले असून कुस्ती ही महाराष्ट्राची ओळख असल्याचे मत माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील तालुका क्रीडा संकुल, दसरा मैदान येथे आयोजित आडत व्यापारी वेल्फेअर असोसिएशन कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर परिषद उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरु हावगीस्वामी यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेच्या प्रसंगी म्हणून बोलत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis