कायदेशीर वर्तनातूनच सुसंस्कृत व प्रगत समाज घडेल - पोनि अशोक गीते
परभणी, 07 जानेवारी (हिं.स.)। कायद्याने वागणे हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसाच्या समुदायाकडूनच जास्त अपेक्षित आहे, समाज सुसंस्कृत व प्रगत बनवायचा असेल तर तो कायदेशीर वर्तनातूनच घडेल, असे मत सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गीते यांनी येथे
कायदेशीर वर्तनातूनच सुसंस्कृत व प्रगत समाज घडेल - पोनि अशोक गीते


परभणी, 07 जानेवारी (हिं.स.)।

कायद्याने वागणे हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसाच्या समुदायाकडूनच जास्त अपेक्षित आहे, समाज सुसंस्कृत व प्रगत बनवायचा असेल तर तो कायदेशीर वर्तनातूनच घडेल, असे मत सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गीते यांनी येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.

सोनपेठ शहरातील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पोलिस दलाच्या वतीने आज बुधवार 7 जानेवारी रोजी पोलीस दल स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलिस दलाची रचना व कायदेविषयक मदती संदर्भात आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक आशोक गिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, रामेश्‍वर कदम, किरण स्वामी, प्रा. डॉ. गोविंद वाकणकर तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापनेनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या समारोपानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना सपोनि विनोद चव्हाण यांनी देशनिष्ठा म्हणजे कायदेशीर वागणे होय, कोणत्याही कायद्याचे आपल्याकडून उल्लंघन होणार नाही, अशी दक्षता नागरिकांनी घेतल्यास गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आपोआप आळा बसेल असे मत व्यक्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande