ठाण्यात रांगोळी व चित्रकलेच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती
ठाणे, 07 जानेवारी (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप (SVEEP) मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत शहरभर विविध शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला, निबंध व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून विद्यार्थ्यां
ठाण्यात रांगोळी व चित्रकलेच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती*


ठाणे, 07 जानेवारी (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप (SVEEP) मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत शहरभर विविध शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला, निबंध व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

मतदानाचा टक्का वाढावा तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीने दिलेला अधिकार बजावावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आहे. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. मिताली संचेती यांच्या सहकार्याने शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे.

ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 56, ओवळा येथे आज मंगळवारी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. रंगीबेरंगी रांगोळ्यांमधून “मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य” हा संदेश विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेने पोहोचवला.

दिवा प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र. 27 व 28 मध्ये एस. एम. जी. विद्यालय, दिवा स्टेशन (पूर्व) येथे मतदान जनजागृतीसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनंत धादवे, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वीप पथक प्रमुख सचिन वायदंडे यांच्यासह मच्छिंद्र मुंडे, गिरीश शेलार, शिवा सांगळे, निवृत्ती जाधव व संपूर्ण टीम उपस्थित होती.

वागळे प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्र. 16, 17 व 18 मधील श्रीनगर व शांतीनगर परिसरातील शाळांमध्येही रांगोळी स्पर्धांद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. यासोबतच सहकारी बँकांना भेट देऊन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच लोकमान्य प्रभाग समिती अंतर्गत ठाणे मनपा शाळा क्रमांक 120, सावरकर नगर येथे चित्रकला स्पर्धा तर ज्ञानोदय विद्यालयात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

या सर्व उपक्रमांमुळे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक जाणीव निर्माण होऊन लोकशाही सशक्त करण्यास मोठे योगदान मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande