बीड : धर्मनाथ बीज सप्ताहासाठी घाटसावळीत स्वागत सोहळा
बीड, 07 जानेवारी (हिं.स.)। धर्मनाथ बीज निमित्त घाटसावली येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. या निमित्ताने श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे महंत शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांचे ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

या सप्ताहाची सुरुवात १३ जानेवारी मंगळवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. कार्यक्रम २० जानेवारीपर्यंत चालणार आहे. दररोज नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायक आणि वादक सहभागी होणार आहेत. १३ जानेवारी रोजी संजय नाना धोंडगे नाशिक यांचे कीर्तन होईल. १४ जानेवारीला कविराज झावरे अहिल्यानगर, १५ जानेवारीला जानेवारीला योगीराज महाराज गोसावी पैठण, १७ जानेवारीला कृष्णा महाराज चौरे पंढरपूर, १८ जानेवारीला श्रवण महाराज जगताप विसापूर, १९ जानेवारीला चंद्रकांत महाराज खळेकर राहुरी यांचे कीर्तन होईल. २० जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत अक्रूर महाराज साखरे गेवराई यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसाद होईल. संध्याकाळी रामायणाचार्य पदमकर महाराज देशमुख अमरावती यांचे कीर्तन होईल. रात्री हरिजागर आणि भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह भ प शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

 rajesh pande