कन्नड घाटात भीषण अपघात; तिघे ठार, चौघे गंभीर जखमी
जळगाव , 08 जानेवारी (हिं.स.) उज्जैन येथे दर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाने घाला घातला आहे. चाळीसगावमधील कन्नड घाटात कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून यामध्ये नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली अस
चौघे गंभीर जखमी


जळगाव , 08 जानेवारी (हिं.स.) उज्जैन येथे दर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाने घाला घातला आहे. चाळीसगावमधील कन्नड घाटात कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून यामध्ये नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे प्राप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दर्शनासाठी एका मित्रांचा ७ जणांचा ग्रुप चारचाकीने जात असताना जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीचा भीषण अपघात झाला.या अपघातात नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील तिघांचा मृत्यू झाला. तर इतर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातील जखमींना सध्या जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातातील जखमींमध्ये योगेश तुकाराम सोनवणे (वय २८, रा. शेवगाव), अक्षय शिवाजी गिरे (वय २५, रा. शेवगाव), ज्ञानेश्वर कांता मोडे (वय २४, रा. शेवगाव), रमेश घुगे (वय २६, रा. शेवगाव)तुषार रमेश घुगे (वय २६, रा. शेवगाव) यांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये तुकाराम रामभाऊ अंभोरे (वय २७, रा. शेवगाव), शेखर रमेश दुरपते (वय ३१, रा. शेवगाव), घनशाम रामहरी पिसोटे (वय ३०, रा. शेवगाव) यांचा समावेश आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर कार अपघात कन्नड घाटात झाल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.या भीषण अपघातामुळे शेवगाव परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.ग्रामीण पोलिस स्टेशनला अकस्मात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande