संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून , अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला
नवी दिल्ली, 09 जानेवारी (हिं.स.) : संसदेत यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. संसदीय काकाजावरील केंद्रीय समितीने ठरविलेल्या संभाव्य कार्यक्रमानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २८ जानेवारीला दोन्ही सभांची संयुक्त
लोकसभेतील विरोधकांच्या गोंधळाचे छायाचित्र


नवी दिल्ली, 09 जानेवारी (हिं.स.) : संसदेत यावर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. संसदीय काकाजावरील केंद्रीय समितीने ठरविलेल्या संभाव्य कार्यक्रमानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २८ जानेवारीला दोन्ही सभांची संयुक्त बैठक संबोधित करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी आज, शुक्रवारी सांगितले.

बीटिंग रिट्रीट सोहळ्यामुळे २९ जानेवारीला संसदेची बैठक होणार नाही. त्यानंतर, ३० जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण सादर होण्याची शक्यता आहे. तसेच ३१ जानेवारीला देखील लोकसभा आणि राज्यसभेची बैठक आयोजित होणार नाही.

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी, रविवार रोजी सादर केला जाईल. त्यानंतर, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर, संसदेची बैठक १३ फेब्रुवारी रोजी सुमारे एक महिन्याच्या सुट्टीसाठी स्थगित केली जाईल.संसदेची बैठक ९ मार्च रोजी पुन्हा सुरू होईल आणि हे अधिवेशन २ एप्रिल, गुरुवारी संपणार आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande