घरोघरी घसादुखी आणि खोकल्याचे रुग्ण : बदलत्या हवामानाचा आरोग्याला फटका
बीड, 08 जानेवारी (हिं.स.) जिल्ह्यातील सततच्या हवामान बदलामुळे घरोघरी घसादुखी आणि खोकल्याचे रुग्ण वाढले असल्याचे दिसून आले आहे.बदलत्या हवामानाचा आरोग्याला फटका बसलेला दिसून येतो सततच्या बदलामुळे बीड जिल्ह्याच्या परिसरात आजारांचे प्रमाण कमालीचे वाढ
घरोघरी घसादुखी आणि खोकल्याचे रुग्ण : बदलत्या हवामानाचा आरोग्याला फटका


बीड, 08 जानेवारी (हिं.स.) जिल्ह्यातील सततच्या हवामान बदलामुळे घरोघरी घसादुखी आणि खोकल्याचे रुग्ण वाढले असल्याचे दिसून आले आहे.बदलत्या हवामानाचा आरोग्याला फटका बसलेला दिसून येतो

सततच्या बदलामुळे बीड जिल्ह्याच्या परिसरात आजारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. सध्या घरोघरी घसादुखी, कोरडा खोकला आणि तापाचे रुग्ण आढळून येत असून, खासगीसह सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांना या बदलत्या वातावरणाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वातावरणात वारंवार बदल होत असतांना दिसून येत आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री अचानक वाढणारा गारवा, अशा विचित्र हवामानामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होत आहे. हवेतीलआर्द्रता आणि धुळीकणांमुळे 'घशाचे संसर्ग' वेगाने पसरत आहेत. सुरुवातीला घसा खवखवणे आणि त्यानंतर तीव्र खोकला व अंगदुखी अशी लक्षणे बहुतांश रुग्णांमध्ये

दिसून येत आहेत. संसर्गजन्य स्वरूपामुळे कुटुंबातील एका सदस्याला लागण झाल्यास संपूर्ण घर आजारी पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

घसा दुखी असल्यास कोमट पाणी प्यावे आणि मीठ टाकून गुळण्या कराव्यात, आईस्क्रीम, थंड पेये आणि तेलकट पदार्थांचे सेवन सध्या टाळलेलेच बरे. संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून परस्पर औषधे घेऊन खाणे धोक्याचे ठरू शकते. अंगावर आजार न काढता त्वरीत डॉक्टरांना दाखवावे. असे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande