संभाजी पाटील निलंगेकरांनी साधला मतदारासोबत संवाद
लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)।लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 15 मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी नगरसेवक विजय धन्ना याच्या निवासस्थानी कॉर्नर बैठक संपन्न झाली. यावेळी सर्व मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधून सर्वांच्या
प्रभाग क्र. 15 कॉर्नर बैठक..!  लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 15 मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी नगरसेवक विजय धन्ना याच्या निवासस्थानी कॉर्नर बैठक संपन्न झाली. यावेळी सर्व मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधून सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या उद्या सोडवण्याची हमी दिली. तसेच लातूरच्या विकासयात्रेत योगदान देण्याचे आवाहन केले.  आपल्या शहराच्या विकासासाठी स्वत: मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस हे सज्ज झाले असून आपल्या शहराचे पालकत्व त्यांनी घेतले आहे. त्यामुळे आता आपण सर्वांनी पुढाकार घेऊन महापालिकेत भाजपाचे सरकार आणून शहराला निश्चित दिशा द्यावी, अशी विनंती केली.  यावेळी उमाकांतजी मळगे, अजयजी हाडे, कल्याणजी पाटील, अशोकजी राजे, अतेश्वरजी मंडलापूरे, पंकजजी कुलकर्णी, पवार साहेब जी, निखिलजी मळगे, प्रदीपजी मोरे, किरणजी पाढरे, शेखरजी गोखले आदींसह भाजपा उमेदवार, परिसरातील महिला, नागरिक, मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)।लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. 15 मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी नगरसेवक विजय धन्ना याच्या निवासस्थानी कॉर्नर बैठक संपन्न झाली. यावेळी सर्व मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधून सर्वांच्या समस्या जाणून घेतल्या सोडवण्याची हमी दिली. तसेच लातूरच्या विकासयात्रेत योगदान देण्याचे आवाहन केले.

आपल्या शहराच्या विकासासाठी स्वत: मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस हे सज्ज झाले असून आपल्या शहराचे पालकत्व त्यांनी घेतले आहे. त्यामुळे आता आपण सर्वांनी पुढाकार घेऊन महापालिकेत भाजपाचे सरकार आणून शहराला निश्चित दिशा द्यावी, अशी विनंती केली.

यावेळी उमाकांतजी मळगे, अजयजी हाडे, कल्याणजी पाटील, अशोकजी राजे, अतेश्वरजी मंडलापूरे, पंकजजी कुलकर्णी, पवार साहेब जी, निखिलजी मळगे, प्रदीपजी मोरे, किरणजी पाढरे, शेखरजी गोखले आदींसह भाजपा उमेदवार, परिसरातील महिला, नागरिक, मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande