
मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.)। अलीकडची भारतीय घरे ही मोठ्या प्रमाणात व्यक्तिमत्त्वाची निदर्शक असतात. आणि त्यामुळेच ग्राहक देखील अशा घरगुती उपकरणांच्या शोधात असतात, जे डिझाइन, नावीन्य आणि सोयीचा उत्तम समतोल साधतात. राहण्याच्या आधुनिक जागांना आकार देणारी, स्टायलिश पण अत्यंत कार्यक्षम उपकरणे बनवण्याच्या या बदलामध्ये गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या अप्लायन्सेस व्यवसायाने बाजी मारली आहे. इऑन इन्स्पायर आणि एज इम्प्रेस ही फ्रॉस्ट-फ्री आणि डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरची श्रेणी सादर केली आहे. कालातीत डिझाइन तत्त्वज्ञानावर आधारित आणि प्रगत तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि फ्लुइड कर्व्हड डोअर असलेली ही श्रेणी लक्षवेधक आहे. 1958 मध्ये या ब्रँडने भारतातच बनवलेल्या पहिल्या रेफ्रिजरेटरप्रति ही एकप्रकारे कृतज्ञता आहे. या श्रेणीमध्ये भारताचा पहिला डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर देखील समाविष्ट आहे, ज्याच्या दरवाजाच्या हँडलवर टच कंट्रोल आहे.
हा ब्रँड या नवीन रेंजद्वारे रेफ्रिजरेटरची केवळ एक आवश्यक उपकरण ही ओळख बदलून, त्याला घरातील एक प्रमुख रचनात्मक घटक म्हणून सादर करत आहे. ज्यातून घरमालकाच्या व्यक्तिमत्त्वाची आणि आवडीची झलक समोर येते. सरळ रेषा आणि पारंपरिक आकार यापासून थोडी वेगळी रचना करत या रेफ्रिजरेटरचा मिनिमलिस्ट पण अखंड, दरवाजाची वक्र रचना त्याचे अद्वितीय व्यक्तिमत्त्व अधोरेखित करते. शिवाय, फुलांच्या डिझाइनमध्ये निसर्गाची प्रेरणा घेऊन एक दृश्यात्मक ताजेपणा आणला आहे. आणि यातील प्रत्येक रंग विविध प्रकारच्या घरांच्या सजावटीला पूरक ठरेल अशा प्रकारे निवडला आहे, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या जागेचे सौंदर्य वाढवणारा रेफ्रिजरेटर निवडू शकतात. 194 लिटरपासून ते 330 लीटर क्षमतेपर्यंत उपलब्ध असलेली ही रेंज आधुनिक सौंदर्यशास्त्र आणि प्रगत तांत्रिक वैशिष्ट्यांचे उत्तम समायोजन करते. हँडलवरील डिजिटल कंट्रोल पॅनल हा या क्षेत्रातील पहिलाच प्रयोग असून डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरला एक तंत्रज्ञान-आधारित किनार देते, ज्यामुळे ग्राहक हँडलमधील आकर्षक, जल-प्रतिरोधक आणि वापरण्यास सोप्या इंटरफेसद्वारे तापमान समायोजित करू शकतात. तसेच वेगवेगळे मोड्स सक्रिय करू शकतात, यामुळे परिस्थितीवर नियंत्रण तर ठेवले जातेच पण अतिरिक्त सोय देखील होते.
या लाँचबद्दल गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या अप्लायन्सेस व्यवसायातील रेफ्रिजरेटर्स विभागाचे प्रोडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव म्हणाले, “इऑन इन्स्पायर आणि एज इम्प्रेसच्या माध्यमातून, ग्राहकांसाठी दैनंदिन जीवन सोपे आणि अधिक सुलभ करणे हे आमचे ध्येय होते. दरवाजाच्या हँडलवर असलेल्या वापरायला सोप्या अशा कंट्रोल्सपासून ते बदलत्या गरजांनुसार जुळवून घेणाऱ्या वैशिष्ट्यांपर्यंत, हे रेफ्रिजरेटर्स आधुनिक घरांसाठी सोयीस्कर, अधिक स्मार्ट कूलिंग आणि एक अनोखा अनुभव देण्यासाठी डिझाइन केले आहेत.”
अशा प्रकारच्या डिझाइनमागील विचार अधोरेखित करताना, गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या अप्लायन्सेस व्यवसायाचे डिझाइन प्रमुख कमल पंडित म्हणाले, “आजच्या ग्राहकांच्या मागण्या, गरजा बदलल्या आहेत. त्यांना दिसायला आकर्षक, आधुनिक आणि वापरायला सोयीची अशी उपकरणे हवी आहेत. इऑन इन्स्पायर आणि एज इम्प्रेसच्या माध्यमातून, आम्ही आमच्या पहिल्या रेफ्रिजरेटरच्या मूळ संकल्पनेकडे परत गेलो आणि आजच्या घरांसाठी त्याची पुनर्कल्पना केली. याचे सौंदर्य साधे पण आकर्षक आणि त्याच्या वापरासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा समतोल साधला जावा, या हेतूने त्याचे काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आलेले आहे.”
प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणि संपूर्ण भारतातील दुकानांमध्ये ही रेंज 29,000 रुपये ते 56,000 रुपये एमआरपीमध्ये उपलब्ध असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर