ओप्पो रेनो 15 5G सिरीज भारतात लॉन्च
मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.)। स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने आपली नवी ओप्पो रेनो 15 5G सिरीज भारतात लॉन्च केली असून या सिरीजमध्ये रेनो 15, रेनो 15 प्रो आणि रेनो 15 प्रो मिनी हे तीन मॉडेल समाविष्ट करण्यात आले आहेत. 2024 मधील रेनो 14 सिरीजचा उत्त
Oppo Reno 15 5G Series


मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.)। स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने आपली नवी ओप्पो रेनो 15 5G सिरीज भारतात लॉन्च केली असून या सिरीजमध्ये रेनो 15, रेनो 15 प्रो आणि रेनो 15 प्रो मिनी हे तीन मॉडेल समाविष्ट करण्यात आले आहेत. 2024 मधील रेनो 14 सिरीजचा उत्तराधिकारी म्हणून ही सिरीज बाजारात आणली असून रेनो 15 प्रो मिनी हा मॉडेल भारतीय बाजारात प्रथमच सादर करण्यात आला आहे. सर्व स्मार्टफोन अँड्रॉइड 16 वर आधारित कलरओएस 16 वर कार्यरत आहेत.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास ओप्पो रेनो 15 5G च्या 8GB + 256GB बेस व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये आहे, तर 12GB + 256GB आणि 12GB + 512GB मॉडेल्स अनुक्रमे 48,999 आणि 53,999 रुपयांना उपलब्ध आहेत. रेनो 15 प्रो 5G ची किंमत 67,999 रुपयांपासून तर रेनो 15 प्रो मिनी 5G ची किंमत 59,999 रुपयांपासून सुरू होते. ही नवी सिरीज 13 फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असून फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि ओप्पो इंडिया ऑनलाइन स्टोअरवरून ती खरेदी करता येईल.

ओप्पो रेनो 15 प्रो आणि रेनो 15 प्रो मिनी हे दोन्ही फोन ड्युअल-सिमसह येतात आणि दोन्हीमध्ये उच्च दर्जाच्या AMOLED डिस्प्लेची सुविधा देण्यात आली आहे. Reno 15 Pro मध्ये 6.78 इंचांचा फुल-HD+ LTPO AMOLED स्क्रीन असून 120Hz रिफ्रेश रेट, 1,800 निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन दिले आहे. Reno 15 Pro Mini मध्ये 6.32 इंचांचा 1.5K LTPS AMOLED डिस्प्ले असून यालाही समान रिफ्रेश रेट आणि उच्च ब्राइटनेससोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 चे संरक्षण देण्यात आले आहे. दोन्ही मॉडेल्स मीडियाटेक डायमेन्सिटी 8450 प्रोसेसरद्वारे समर्थित असून Mali-G720 MC7 GPU, 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजची सुविधा उपलब्ध आहे.

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास रेनो 15 प्रो आणि रेनो 15 प्रो मिनी मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात OIS आणि PDAFसह 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 116-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 3.5x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून 4K 60fps HDR व्हिडिओ रेकॉर्डिंगचा सपोर्टही मिळतो. दोन्ही फोनमध्ये Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.4, GPS, NFC, USB Type-C यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तसेच IP68 आणि IP69 रेटिंगद्वारे धूळ व पाण्यापासून संरक्षण देण्यात आले आहे. रेनो 15 प्रो मध्ये 6,500mAh तर रेनो 15 प्रो मिनी मध्ये 6,200mAh क्षमतेची बॅटरी असून 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो, तसेच Pro व्हेरिएंटमध्ये 50W वायरलेस चार्जिंगची सुविधादेखील आहे.

ओप्पो रेनो 15 5G मॉडेलमध्ये 6.59 इंचांचा LTPS AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्स पीक ब्राइटनेससह कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i चे संरक्षण दिले आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 चिपसेट, 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज उपलब्ध आहे. कॅमेरासाठी 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा 3.5x पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे, तर 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी आहे.

या मॉडेलमध्येही 6,500mAh बॅटरी देण्यात आली असून 80W वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट उपलब्ध आहे. एकूणच उच्च दर्जाचा डिस्प्ले, शक्तिशाली प्रोसेसर, प्रगत कॅमेरा क्षमता आणि दमदार बॅटरीमुळे Oppo Reno 15 5G सिरीज प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये वापरकर्त्यांसाठी आकर्षक पर्याय ठरणार असल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande