
पणजी, 8 जानेवारी (हिं.स.) : ग्रो म्युच्युअल फंडने ‘ग्रो स्मॉल कॅप फंड’ या नव्या ओपन-एंडेड इक्विटी योजनेच्या लाँचची घोषणा केली आहे. हा फंड प्रामुख्याने स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणार असून, न्यू फंड ऑफर (NFO) 8 जानेवारी ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत खुला राहणार आहे.
ग्रो म्युच्युअल फंडच्या QGaRP (वाजवी किमतीत गुणवत्ता आणि वाढ) चौकटीवर आधारित, हा ट्रू-टू-लेबल स्मॉल कॅप फंड शिस्तबद्ध बॉटम-अप शेअर निवड धोरण अवलंबतो. मजबूत मूलभूत घटक, शाश्वत वाढीची क्षमता आणि वाजवी मूल्यांकन असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवली वाढ साध्य करणे हा योजनेचा उद्देश आहे.
भारतामधील पायाभूत सुविधा, डिजिटलायझेशन आणि भांडवली बाजारातील सुधारणा यामुळे स्मॉल कॅप कंपन्यांसाठी वाढीच्या संधी वाढत असल्याचे कंपनीने नमूद केले. तुलनेने कमी विश्लेषक कव्हरेजमुळे या विभागात निवडक दर्जेदार कंपन्या ओळखण्याची संधी उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या फंडाचे बेंचमार्क निफ्टी स्मॉलकॅप 250 TRI असून, फंड मॅनेजर अनुपम तिवारी असतील. किमान गुंतवणूक ₹500 पासून करता येईल. वाटपाच्या तारखेपासून एका वर्षाच्या आत रिडीम केल्यास 1% एग्झिट लोड आकारला जाईल.
दीर्घकालीन गुंतवणूक दृष्टीकोन असलेल्या आणि तुलनेने जास्त चढउतार स्वीकारण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य पर्याय ठरू शकतो, असे ग्रो म्युच्युअल फंडने सांगितले.
योजनेचा प्रकार :- स्मॉल कॅप शेअर्समध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करणारी ओपन-एंडेड इक्विटी योजना
बेंचमार्क :- निफ्टी स्मॉलकॅप २५० निर्देशांक – टीआरआय
एनएफओ कालावधी :- ८ जानेवारी ते २२ जानेवारी २०२६
फंड मॅनेजर :- अनुपम तिवारी
किमान गुंतवणूक:- ₹५०० आणि त्यानंतर ₹१ च्या पटीत
एग्झिट लोड:- वाटपाच्या तारखेपासून १ वर्षाच्या आत रिडीम केल्यास १%; त्यानंतर शून्य
सूचना :- गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी योजनेचा माहिती दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावा.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी