
पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)। हिंजवडी ‘आयटी-हब’ला शहराशी जोडणाऱ्या ‘पुणे मेट्रो लाईन ३’ (हिंजवडी – शिवाजीनगर) प्रकल्पावरील मेट्रोची आज सकाळी ८ वाजता माण डेपो ते पुणे विद्यापीठ चौक या दरम्यान मेट्रोची तांत्रिक चाचणी (ट्रायल रन) यशस्वीपणे पार पडली. या चाचणीमुळे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आता प्रत्यक्षात धावण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून यामुळे निर्णायक टप्पा गाठला जाणार आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सार्वजनिक, खासगी, भागीदारी (पीपीपी) तत्वानुसार पीएमआरडीए, टाटा समूह आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्या माध्यमातून हिंजवडी ते शिवाजीनगर अशा २३.३ किलोमीटर उन्नत मार्गिका प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले आहे. या मार्गिकेवर जुलै २०२५ मध्ये माण डेपो ते पुणे विद्यापीठ दरम्यान पहिली चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये माण डेपो ते बालेवाडी क्रीडा संकुलपर्यंत चाचणी घेण्यात आली. गेल्या तीन दिवसांपूर्वी चाचणी घेण्यात आली असून यामध्ये तंत्री बिघाड समोर आला होता. आज सकाळपासून ठराविक अंतराच्या टप्प्यांवर चाचण्या घेण्यास सुरुवा झाली. या चाचण्यांमध्ये निर्माण झालेले तांत्रिक बिघाड रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) माध्यमातू दूर करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु