डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन
पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)।जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ आणि पर्यावरण संरक्षण चळवळीचे मार्गदर्शक डॉ. माधव गाडगीळ (वय ८३) यांचे बुधवारी रात्री उशिरा पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाच्या पर्यावरणीय विश्वात मोठी पोकळी
Madahva gadgil newss


पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)।जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ आणि पर्यावरण संरक्षण चळवळीचे मार्गदर्शक डॉ. माधव गाडगीळ (वय ८३) यांचे बुधवारी रात्री उशिरा पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाच्या पर्यावरणीय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. गाडगीळ यांनी जैवविविधता संवर्धन, लोकसहभागातून नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विषयांवर मोलाचे संशोधन व लेखन केले.डॉ. गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ रोजी पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातच झाले. तत्कालीन पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथून त्यांनी जीवशास्त्रातील पदवी शिक्षण घेतले. हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात पीएच.डी. मिळवली. ते हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे तसेच उपयोजित गणितशास्त्र विभागाचे फेलो होते. १९७३ ते २००४ या कालावधीत ते बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. त्यांनी तेथे ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande