पुणे : नवीन ‘ई- बस’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण
पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)।जानेवारीच्या अखेरीस ‘पीएमपी’च्या ताफ्यात ५० नवीन ‘ई-बस’ दाखल होत आहेत. ‘ओलेक्ट्रा’ कंपनीच्या या बस असून, बसची तपासणी करण्यासाठी ‘पीएमपी’चे पथक हैदराबाद येथील कंपनीच्या कारखान्यात दाखल झाले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत २
PMPML


पुणे, 08 जानेवारी (हिं.स.)।जानेवारीच्या अखेरीस ‘पीएमपी’च्या ताफ्यात ५० नवीन ‘ई-बस’ दाखल होत आहेत. ‘ओलेक्ट्रा’ कंपनीच्या या बस असून, बसची तपासणी करण्यासाठी ‘पीएमपी’चे पथक हैदराबाद येथील कंपनीच्या कारखान्यात दाखल झाले आहे. येत्या चार ते पाच दिवसांत २५ बस दाखल होतील, तर उर्वरित २५ बस जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दाखल होण्याची आशा आहे. निगडी बस आगारात या ५० बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. ‘पीएमपी’च्या ताफ्यात गेल्या वर्षी १६० ‘ई-बस’ दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव या बसना विलंब झाला. १६० पैकी २५ बसचे उत्पादन होऊन तयार आहे. ‘पीएमपी’चे पथक बसची तपासणी पूर्ण केल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेचे अधिकारीदेखील बस ताब्यात घेण्यापूर्वी एकदा पाहणी करून बस योग्य असल्याचे प्रमाणपत्र देतील. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लागलीच बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande