
बीड, 08 जानेवारी (हिं.स.)।
माजलगाव तालुक्यातील रेणापुरी येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. विष्णू महाराज रासवे यांच्या शिवमहापुराण कथेने श्रोत्यांच्या अंतःकरणात शिवभक्ती जागृत केली असून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याने अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
महारुद्र महाराज पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या सप्ताह काळात दररोज पहाटे काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, महाशिवपुराण कथा, हरिपाठ व हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम श्रद्धेने पार पडत आहेत. संतपरंपरेचा जागर करत सुरेश महाराज काशिद, रामायणाचार्य गणेश लोंढे, प्रकाश वाघमारे महाराज, विनोदाचार्य माऊली पुंगळकर, भागवताचार्य वैभव जगताप, नामदेव घाटुळ महाराज व महारुद्र पवार यांनी आपल्या कीर्तनातून भक्ती, नीती व सदाचाराचा संदेश दिला. सप्ताहास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा गजर केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis