
छत्रपती संभाजीनगर, 08 जानेवारी (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ येथील हिवाळे पाटील लॉन्स येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. अनिता मोहनलाल साळवे, सौ. सविता कुलकर्णी, श्री. पदमसिंग राजपूत व श्री. आप्पासाहेब विनायकराव हिवाळे यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न भाजपचेखासदार भागवत कराड यांच्या हस्ते झाले. या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभागातील निवडणूक प्रचाराला नवी दिशा मिळाली असून, विकास, सुशासन आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी सक्षमपणे निवडणूक लढवत असल्याचा स्पष्ट संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता, प्रभाग क्रमांक २६ मध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीला भक्कम जनादेश देऊन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत सक्षम व विकासाभिमुख नेतृत्व उभे करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी एकमुखाने केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis