
बीड, 08 जानेवारी (हिं.स.)।
अंबाजोगाई शहरातील नामांकित महाविद्यालयातील
प्रा. ममता राठी जळीत प्रकरणाचे गूढ अखेर उलगडले आहे. मानलेल्या भावास आत्महत्येपासून रोखताना दुर्घटना झाली असल्याचे सांगण्यात आले आहे
अंबाजोगाई येथील एका नामांकित संस्थेतील प्राध्यापिका डॉ. ममता शामसुंदर जखोटिया (राठी) यांच्या जळीत प्रकारचे सत्य अखेर त्यांच्या जबाबानंतर समोर आले आहे. मानलेला भाऊ धनाजी आर्य यांना आत्महत्येपासून रोखताना अपघाताने मी भाजले असे ममता राठी यांनी बर्दापूर पोलिसांना दिलेल्या जबाबातून स्पष्ट केले आहे.
कॉलेजमधील सहकारी तथा मानलेले भाऊ धनाजी आर्य हे जवळगाव फाटा येथे आत्महत्या करत असताना त्यांना रोखण्यासाठी ममता राठी तेथे गेल्या होत्या. त्यांच्या हातातील डिझेलची बाटली हिसकावताना डिझेल अंगावर उडाले आणि अचानक आग लागली. या दुर्घटनेत गंभीर भाजलेल्या ममता राठी यांच्यावर लातूर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis