बीड : आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यांना ११ नव्या ट्रान्सफॉर्मर मंजुर
बीड, 09 जानेवारी (हिं.स.)। मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी २.० योजनेअंतर्गत आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांतील कृषी वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय झाला. या तीनही तालुक्यांतील एकूण ११ वीज उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० आणि ५ एम.व्ही.ए
आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यांना ११ नव्या ट्रान्सफॉर्मरसाठी मंजुरी


बीड, 09 जानेवारी (हिं.स.)।

मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी २.० योजनेअंतर्गत आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांतील कृषी वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय झाला. या तीनही तालुक्यांतील एकूण ११ वीज उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० आणि ५ एम.व्ही.ए. क्षमतेचे नवीन ऍडिशनल पावर ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले.

या मंजुरीसाठी आमदार सुरेश धस यांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासनाशी समन्वय साधला. शेतकऱ्यांच्या अडचणी शासन दरबारी मांडल्या. कृषी वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी, वाढता भार आणि अपुरी ट्रान्सफॉर्मर क्षमता लक्षात घेऊन त्यांनी हा विषय प्राधान्याने लावून धरला. १० एम.व्ही.ए. क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आष्टी आणि धानोरा येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रांना मंजूर झाले. ५ एम.व्ही.ए. क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर सावरगाव, जळगाव (कडा कारखाना), डोईठाण, कुसळंब, लांबरवाडी, कोतन,

दासखेड, घाटशीळ पारगाव आणि भायाळ या उपकेंद्रांना मंजूर झाले. या नव्या ट्रान्सफॉर्मरमुळे कृषी पंपांना स्थिर वीज मिळेल. भार नियंत्रण होईल. कमी व्होल्टेजची समस्या दूर होईल. शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत दर्जेदार वीज मिळेल. परिणामी शेती उत्पादनात वाढ होईल. उत्पन्नातही सकारात्मक बदल दिसेल.

भारनियमन आणि कमी दाबाने शेतकऱ्याना वीज पुरवठा होत असल्याने शेती व व्यवसायात मोठी अडचण निर्माण झाली. पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने त्रस्त शेतकऱ्यांनी विद्युत रोहित्राची मागणी केली होती. या मंजुरीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande