
बीड, 09 जानेवारी (हिं.स.)। बीड येथील बलभीम महाविद्यालयामध्ये डॉ. जगदीशचंद्र बोस यांच्या स्मरणार्थतीन दिवसीय व्याख्यानमालेला सुरूवात झाली. या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ पार पडला आहे. १० जानेवारी दरम्यान ही व्याख्यानमाला होणार आहे.
उद्घाटक म्हणून स्वा. सावरकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. उत्तम साळवे उपस्थित होते. त्यांनी 'सेंद्रिय शेती : काळाची गरज' या विषयावर मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीचे फायदे, तोटे आणि गरज यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब कोकाटे होते. त्यांनी अमेझॉन खोऱ्यातील जैवविविधता आणि प्राणवायू निर्मिती प्रक्रियेवर भाष्य केले. आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. अनिल चिंधे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सविता सुक्ते मंचावर उपस्थित होत्या.
समारंभास वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. शैलेंद्र चौधरी, प्रा. दिग्विजय कोकाटे, प्रा. किरण राणे, प्रा. देवगुडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis