छत्रपती संभाजीनगरात सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची सभा
छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)। शिवसेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 18 येथे भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या प्रचार सभेसाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. प्रवीण तरडे यांची विशेष उपस्थिती लाभली. सभ
श्री.


छत्रपती संभाजीनगर, 09 जानेवारी (हिं.स.)।

शिवसेना नेते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 18 येथे भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले.

या प्रचार सभेसाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री. प्रवीण तरडे यांची विशेष उपस्थिती लाभली. सभेला संबोधित करत त्यांनी आपल्या सिनेस्टाईल भाषणातून उपस्थित नागरिकांची मने जिंकली आणि शिवसेनेच्या विचारधारेला भक्कम पाठबळ दिले.

या वेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनेचा प्रसार व प्रचार करत येणाऱ्या 15 तारखेला शिवसेना – धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रभाग क्रमांक 18 मधील चारही अधिकृत उमेदवारांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चित फडकवण्याचा निर्धार उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

या प्रचार सभेला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल तसेच उपस्थित सर्व नागरिक, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना व कार्यकर्त्यांचे पालकमंत्री शिरसाट यांनी आभार व्यक्त केले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande