नांदेड - गजानन महाराज मंदिरात १ फेब्रुवारीपासून भरगच्च कार्यक्रम
नांदेड, 09 जानेवारी (हिं.स.)। शेगावीचे श्रीसंत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या पर्वावर येथील श्री गजानन महाराज मंदिरात १ फेब्रुवारीपासून अखंड हरीनाम सप्ताह, संगीतमय देवी भागवत कथा होणार आहे. ६, ७, ८ फेब्रुवारी रोजी श्री चंडी महायाग यज्ञ, श्रींच्य
नांदेड - गजानन महाराज मंदिरात १ फेब्रुवारीपासून भरगच्च कार्यक्रम


नांदेड, 09 जानेवारी (हिं.स.)। शेगावीचे श्रीसंत गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या पर्वावर येथील श्री गजानन महाराज मंदिरात १ फेब्रुवारीपासून अखंड हरीनाम सप्ताह, संगीतमय देवी भागवत कथा होणार आहे. ६, ७, ८ फेब्रुवारी रोजी श्री चंडी महायाग यज्ञ, श्रींच्या पालखीची मिरवणूक आणि ९ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. नारायण महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. भाविकांनी हरीनाम सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानने केले आहे.

१ फेब्रुवारी रोजी रात्री ह.भ.प. विश्वनाथ देवकत्ते महाराज किनवटकर यांचे कीर्तन आणि किनवटच्या भजनी मंडळाचा हरीजागर असेल. २ फेब्रु.ला ह.भ.प.चेतन बोबडे महाराज छत्रपती संभाजीनगर आणि सिरमेटी भजनी मंडळाचा जागर. ३ फेब्रु.ला ह.भ.प.प्रसाद महाराज बोराडे (नगरसोल स्टेशन) भजनी मंडळ कमठाला. ४ रोजी ह.भ.प. रघूनाथ महाराज कराड बोधडीकर आणि मांडवाचे भजनी मंडळ. ५ फेब्रु. रोजी बालकीर्तनकार ह.भ.प. प्रज्वलीदीदी देशमुख शेगावकर आणि वंजारवाडीतील जयहरी भजनी मंडळाचा जागर. ६ रोजी ह.भ.प. योगेश महाराज डापके छ. संभाजीनगर आणि दत्तनगर गोकुंदा भजनी मंडळाचा जागर. ७ फेब्रु.ला ह.भ.प.गजानन महाराज गोरे आळंदी देवाची, रात्री खरबीतील भजनी मंडळाचा जागर. ८ फेब्रु.ला ह.भ.प. लोखंडे महाराज जालनेकरांचे कीर्तन आणि शेवटच्या रात्री सामुदायिक हरीजागर होणार आहे.

६ ते ८ फेब्रु. रोजी श्री चंडी महायाग यज्ञ सोहळा. १ ते ३ फेब्रु. श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण. सप्ताहात दररोज पहाटे ४ ते ६ काकोडा भजन, ९ ते १० जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराजांच्या गाथेवर भजन, संध्याकाळी ६ वाजता श्रीसंत गजानन महाराजांची सामुदायिक आरती, ६.३० ते ७.३० हरीपाठ, ७ ते ९ कीर्तन, १० ते १२ हरीजागर होईल.

सप्ताहात वर्षा माने, भगवान महाराज भेंडे, गजानन महाराज पौळ, सदानंद गुरुजी लोहेकर, माधव महाराज गिरी, संस्कार महाराज आवटे, नवनाथमामा तवळे हे गायकवृंद आणि मृदंगवादक म्हणून बी.एल. कागणे, नागनाथ कदम गुरुजी, ओंकार माने, तुकाराम माने, केशव नैताम हे हार्मोनियमवादक असतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande