छ. संभाजीनगर - खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 9 जानेवारी, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित परिवर्तन सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीपणे पार पडली. या सभेदरम्यान राष्ट्रवादी काँ
अ


छत्रपती संभाजीनगर, 9 जानेवारी, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित परिवर्तन सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीपणे पार पडली. या सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प. गट) महिला शहराध्यक्षा मेहेराजताई पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या सहकाऱ्यांचे स्वागत करत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करत खासदार सुनील तटकरे म्हणाले, शहरातील पाणीपुरवठा, वाहतूक, पायाभूत सुविधा व नागरी सोयीसुविधांबाबत चर्चा करत, उपस्थित नागरिक व कार्यकर्त्यांना निवडणूक चिन्ह घड्याळ समोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकर, आ. श्री. सतीश चव्हाण, श्री. अभिजीत देशमुख तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande