
अकोला, 09 जानेवारी (हिं.स.)।
देशसेवेत कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील सेवारत सैनिक नायक वैभव श्रीकृष्ण लहाने यांना वीरमरण आले. ते १२ मराठा लाइट इन्फंट्री या युनिटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या मूळ गावी कपिलेश्वर येथे सैनिकी व शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहिद लहाने हे जम्मू काश्मिरमध्ये कुपवाडा सेक्टरमध्ये कार्यरत होते. प्रशासनाच्या वतीने तहसीलदार कुणाल झाल्टे, मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे सीएचएम रामेश्वर पाटील, वैभव लहाने यांच्या कुटुंबियांनी पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी सैनिकी विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे